दैनिक पूजा वेळापत्रक

नित्य दैनिक पूजा वेळापत्रक

  • १. मंदिर उघडण्याची वेळ पहाटे ४:४५
  • २. पाद्यपूजा आणि मुखमार्जन सकाळी ५:००
    मुखमार्जन व पायांची पूजा करून लोणी आणि खडीसाखर यांचा नैवेद्य दाखवला जातो.
  • ३. काकड आरती पहिली आरती पहाटे ५:४०
    पाद्यपूजा आणि मुखमार्जन झाल्यानंतर देवीची पहिली आरती संपन्न होते.
  • ४. देवीचे पहिले स्नान सकाळी ८:३०
    घंटा नाद देऊन देवीला पंचामृत अभिषेक व षोडशोपचार पूजा केली जाते.
  • ५. दिवसातील दुसरी आरती सकाळी ९:३०
    खीरीचा नैवेद्य दाखवून आरतीला सुरुवात होते.
  • ६. देवीचे दुसरे स्नान सकाळी ११:३०
    पुन्हा एकदा घंटा नाद देऊन पंचामृत अभिषेक व षोडशोपचार पूजा होते.
  • ७. दिवसातील तिसरी आरती दुपारी १२:३०
    महानैवेद्य (पुरणपोळी) दाखवून आरती केली जाते.
  • ८. अलंकार पूजा दुपारी २:०० - ३:००
    देवीला महावस्त्र नेसवून पारंपारिक सोन्याचे दागिने घालून पूजा केली जाते.
  • ९. दिवसातील चौथी आरती सायंकाळी ८:१०
    लाडू, करंजी व दही पोहे यांचा नैवेद्य दाखवून आरती संपन्न होते.
  • १०. शेजारती (दिवसातील पाचवी आरती) रात्री १०:१०
    दूध व साखरेचा नैवेद्य दाखवून आरतीला सुरुवात होते.
  • ११. मंदिर बंद होण्याची वेळ रात्री १०:३०

कार्तिक मास विशेष

अश्विन कृष्ण चतुर्दशी ते कार्तिक पौर्णिमा यादरम्यान अंबाबाई मंदिरातील नित्य उपचारात बदल होतो.

काकडा विधी

मंदिरातील मुख्य शिखरावर काकडा प्रज्वलित केला जातो. पुजारी भांड्यामध्ये कणकेच्या सुताची जाड वात असलेला काकडा गणपती समोर ठेवतात, त्यावर भक्त कापूर-तूप घालतात. त्यानंतर तो शिखरावर नेऊन मशालीने प्रज्वलित केला जातो.

विधी नरक चतुर्दशी / कार्तिक पौर्णिमा मधील दिवस
काकडा वेळ पहाटे २:३० पहाटे ३:००
मंदिर उघडणे पहाटे ३:०० पहाटे ३:३०
काकड आरती पहाटे ४:०० पहाटे ४:३०
पहिले स्नान सकाळी ५:३०
दुसरी आरती सकाळी ६:३०
चौथी आरती सायंकाळी ७:४०
शेजारती रात्री ९:४०
पालखी (शुक्रवार) रात्री ८:४५
मंदिर बंद रात्री १०:००

*वरील विधी सोडल्यास बाकी सर्व विधी नेहमीच्या वेळेप्रमाणे होतात.

विशेष सोहळे

पालखी उत्सव (नियम)

• कार्तिक पौर्णिमेनंतर रथसप्तमीपर्यंत: रात्री ९:१५
• पाच पौर्णिमांना (शुक्रवार सोडून): रात्री ९:३०
• नित्य पालखी (शुक्रवार): रात्री ९:३०

शंखतीर्थ दुसरी, तिसरी व चौथी आरती झाल्यानंतर देवीची दृष्ट काढून भक्तांवर शंखतीर्थ शिंपडले जाते.
शेजारती पूजा सायंकाळची आरती झाल्यानंतर अलंकार उतरवून देवीला सूती वस्त्र नेसवले जाते.

Events 2026

  • किरणोत्सव (उत्तरायण) ३१- जाने-2026
  • रथोत्सव ११-एप्रिल-2026
  • शारदीय नवरात्र २२-सप्टें-2026
  • किरणोत्सव (दक्षिणायन) ९-नोव्हें-2026

© 2026 श्री अंबाबाई मंदिर न्यास. सर्व हक्क राखीव.